गोंदिया पोलीस दलाचे 8 शिपाई निलबिंत,अधिक्षकांची कारवाई

0
15

गोंदिया,दि.07ः- गोंदिया जिल्हा पोलीस दलातील  8 पोलीस शिपायांना आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी तसेच अवैध जुगारव्यवसायाला सरंक्षण दिल्याच्या कारणावरुन पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी निलबिंत केल्याची माहिती सुत्रांनी दिली.रामनगर पोलीस ठाण्यातून पोलीस हवालदार कृष्णराम ठाकरे, प्रितमकुमार खामले, अनिल पारधी आणि हिरादास पिल्लारे यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर गोंदिया शहर पोलीस ठाण्यातून पोलीस हवालदार सुरेश मेश्राम, मारोती गोमासे, राजानंद वासनिक आणि इंदल आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.या निलबिंत पोलीस शिपायामध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे 4,रामनगर पोलीस ठाण्याचे 4 शिपायांच्या समावेश आहे.