25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीवर अहमद मनिहार

जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीवर अहमद मनिहार

0
26
गोंदिया, दि. ०७ : -अल्पसंख्याक कल्याणाकरीता पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता नव्याने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीच्या सदस्यपदी येथील गोंदिया मुस्लिम जमात संस्थेचे अहमद मनिहार यांची निवड झाली आहे.
अल्पसंख्याकांच्या कल्याणाकरीता पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्हास्तरीय समितीची पूनर्रचना करुन संबंधित जिल्हाधिकाèयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना करण्यात आली. यात गोंदिया जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीमध्ये अल्पसंख्याकांसाठी काम करणाèया नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून गोंदिया मुस्लिम जमातचे अहमद मनिहार यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.