29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण कटरे,विक्की नैताम आरमोरी संघटक

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण कटरे,विक्की नैताम आरमोरी संघटक

0
31

गडचिरोली,दि.09ः- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गडचिरोली युवा महासंघ जिल्हा कार्यध्यक्षपदी किरण कटरे यांची निवड करण्यात आली.तर आरमोरी विधानसभा संघटकपदी विक्की नैताम यांची निवड करण्यात आली आहे.देशात ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा विरोधात आणि घटनात्मक अधिकारासाठी ओबीसींच्या सर्व संघटना एकत्र करून ओबीसी समाजाच्या मागण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघ काम करीत आहे.गडचिरोली जिल्ह्यात ओबीसीवर सातत्याने मोठा अन्याय होत असल्याने जिल्ह्यात लढा अधिक तीर्व करण्यात येत आहे.