सीईओच्या निर्णय़ाविरोधात 18 सप्टेंबरला असहकार आंदोलन

0
18

गोंदिया,दि.12: राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार विविध मागण्यांकरिता ७ ते ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी संप करण्यात आला. त्या संपात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाèयांचे तीन दिवसांचे वेतन कपात करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. त्यामुळे कर्मचाè्यांत कमालीचा असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आपत्ती नोंदविली असून जिल्हा परिषदेने केलेली कृती घटनाबाह्य असून यातून दडपशाही व आकसापोटी आणि द्वेषभावनेतून ही कारवाई करण्यात आली आहे. याविरोधात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्ङ्मावतीने ११ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन सदर प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आलाराज्य शासनाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने शासनाच्या राज्य कर्मचारी समन्वय समिती च्या माध्यमातून वाटाघाटी करून शासनाच्या विनंती ला मान देऊन ९ आॅगष्ट ला दुपारी संप मागे घेतला.त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला कि कोणत्याही कर्मचा-यांचा वेतन कपात केली जाणार नाही.
परंतु संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्हा परिषद कर्मचा-यांचे वेतन कपात करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी मा. राजा दयानिधी जिल्हा परिषद गोंदिया यांनी काढले. हा लढा जिल्हा परिषद च्या विरोधात नसुन महाराष्ट्र शासनाच्या विरोधात होता.म्हणून शासनाचे आदेश येई पर्यंत माहे सप्टेंबर चा वेतनात कपात करू नये अशी विनंती अर्ज दिले. परंतु मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकारीला न जुमानता निर्णय घेतल्यामुळे  समन्वय समितीने १८ सप्टेंबरला संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील कर्मचा-यांचे असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
सोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष  सीमाताई मडावी, उपाध्यक्ष हमीद अल्ताब अकबर अली व आमदार संजय पुराम यांची भेट घेऊन चर्चा करीत निवेदन सादर करण्यात आले.या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारीसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले असून १५ सप्टेंबर पर्यंत होकार दिला नाही तर १८ सप्टेंबरला संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचा-यांचे एक दिवशीय असहकार आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जवाबदारी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची राहील असा निर्णय बैठकित घेण्यात आला.
यावेळी जिल्हा समन्वय समिती पदाधिकारी तथा निमंत्रक लीलाधर पाथोडे, पी जी शहारे, मनोज दिक्षित, शैलेश बैस, विरेंद्र कटरे, एच. आर.लाडे ,कमलेश बिसेन, एल यु खोब्रागडे, एस यु वंजारी,रोशन मस्करे, यशोधरा सोनवाने,प्रकाश ब्राम्हणकर, चंद्रशेखर वैद्य,एम सी चुरे, विठ्ठल भरणे, पठान, लीलाधर तिबुटे, अजय खरवडे, विनोद चौधरी, सुभाष खत्री,डी एल गुप्ता, नरेंद्र वाघमारे , मिलींद मेश्राम, गुणवंत ठाकूर, सुरेन्द्र जगणे, व्हि आर खांडेकर,डी जी फटिंग,एस पी राठोड,एम बी चौहान सह समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सभेचे संचालन पी जी शहारे तर आभार प्रदर्शन एल यु खोब्रागडे यांनी केले.