स्क्रब टायफस आजाराने महिला पोलीस पाटलाचा मृत्यू

0
6

गोंदिया,दि.13 : जिल्ह्यात वेगाने पाय पसरत असलेल्या स्क्रब टायफस या आजाराने आज, गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील थाडेझरी(कोसमतोंडी) येथील महिला पोलीस पाटलाचा बळी घेतला. मृत महिलेचे नाव सीमा यशवंत धुर्वे (34)असे आहे. सीमा धुर्वे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना भंडारा येथील रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दुपारी 12.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात 14 वर्षाचा मुलगा आणि 10 वर्षाची मुलगी आहे. जिल्ह्यात स्क्रब टायफस आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांना या आजाराने आपल्या कवेत घेतले आहे. आरोग्य विभागाने तातडीने या आजारासंबंधाने उपाय योजना करावी, अशी मागणी या निमित्ताने पुढे आली.