नगरसेवकाच्या नातवाचा तलावात बुडून मृत्यू

0
9

गोरेगाव,दि.13: येथील नगर पंचायतीचे नगरसेवक जया मारबते यांच्या नातवाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव प्रणय मनसु मारबते(16) असे आहे.आज गणेश स्थापने निमित्त शाळेला सुट्टी होती. सुटीचा बेत साधून प्रणय आपल्या अंशुल मेश्राम, सौरभ नंदेश्वर, शील मेश्राम आणि आकाश येडे या मित्रांसोबत नजीकच्या मोहंगाव येथील मामा तलावावर अंघोळ करण्याकरिता गेला होता. तलावावर असलेल्या पुलावरून तलावात उडी घेत अंघोळीचा आनंद लुटत होते. प्रणयने पुलावरून तलावाच्या पाण्यात उडी घेतली. पाण्याखाली मोठे दगड होते. त्याच्या डोक्याला दगड लागल्याने त्याचा पाण्यातच मृत्यू झाला. माहिती मिळताच घरच्या मंडळीने तलावाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटना पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तापसणीकरिता रवाना केला. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही अप्रिय घटना घडल्याने गोरेगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.