27.7 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ भरधाव ट्रकने ३ विद्यार्थ्यांना चिरडले, एकाचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकने ३ विद्यार्थ्यांना चिरडले, एकाचा जागीच मृत्यू

0
16
शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय विद्यालय भिवापूर येथील विद्यार्थी सायकलने महाविद्यलयात जात असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. महिन्यापूर्वी याच मार्गवर टिप्परने २ शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच हा अपघात घडला आहे. वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला.संतप्त नागरिकांनी टायर जाळून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भिवापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील आग विझवत संतप्त जमावाला शांत केले