अपघातात पत्नी व मुलगा गंभीर, पतीचा मृत्यू

0
19

तुमसर, दि. १८ :: तुमसर-गोंदिया मार्गावर मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका भरधाव ट्रकने चारचाकी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनचालक जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.रामटेक येथील अंबाला येथील रहिवासी असलेले संजय गौतम हे आपल्या कुटुंबासह जात असताना हा अपघात झाला. यात संजय गौतम हे ठार झाले तर त्यांची पत्नी रंजना व मुलगा पिंटू हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे.