बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर खा.नेतेंनी केले भूमिपूजन 

0
20
गोंदिया,दि.19: जिल्ह्यातून जाणाèया आमगाव-देवरी, चिचगड-ककोडी या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात देवरी ते आमगाव ३८ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाला गेल्या जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झालेली आहे. हरदोली ते देवरी या मार्गावरील सिमेंट रस्ता बांधकामाला सुरुवात होवून एकेरी मार्गाचे बांधकाम व क्रांकेटीकरणाचे काम अंदाजे १० ते १५ किलोमीटर पर्यंत पूर्ण झालेले असले तरी रस्ता बांधकामाची गती मात्र संथ आहे. रस्ता बांधकामाला सात-साठ महिन्यापुर्वी सुरुवात ाझाल्यानंतर आता त्या रस्त्याच्या भूमिपूजनाचे औचित्य काय? असा प्रश्न जनतेत विचारला जावू लागला आहे. भूमिपूजनावर काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला हाणणारे भाजपचे नेतेच आता रस्ता बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर भूमिपूजन करु लागल्याने या नेत्यांनाही भूमिपूजनाशिवाय करमेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोमवार (दि,१७) सप्टेंबर रोजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आमगाव-देवरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ च्या बांधकामाचे भूमिपूजन करुन वाहवाही लूटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुर्वी गोरेगाव तालुक्यात एका मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन काम पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनीच केले होते. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांना व मंत्र्यांना बांधकाम सुरु असलेल्या कामाचेही भूमिपूजन करण्याची हौस निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता केंद्र सरकारच्या निधीतून होत असल्याने किमान या रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनासाठी राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष व स्थानिक लोकप्रतिनिधींना ही आमंत्रीत करायला हवे होते. परंतु बांधकाम करणारी पाटील कंस्ट्रक्शन कंपनीने राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्यांनाही डावलल्याचे बघावयास मिळाले. या रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार नेते म्हणाले की, २८० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गामुळे या क्षेत्राचा विकास होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, माजी आ.केशव मानकर, भेरसिंह नागपुरे, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, उपाध्यक्ष नगर पंचायत आफताब शेख, जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, उपसभापती गणेश सोनबोईर, बाबुराव कोहळे, शांतीलाल जैन उपस्थित होते. प्रास्ताविकातून अंजनकर यांनी देवरी ते आमगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ हे ३८ कि.मी. महामार्ग २८० कोटी रुपयाचे असल्याचे सांगितले. या वेळी एम.बी. पाटील कंस्टड्ढक्शन लिमिटेड पुणेचे संचालक अनुप अग्रवाल व प्रकल्प व्यवस्थापक शालीवान सुरवसे यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून नेते व पुराम यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन कुलदीप लांजेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार यादोराव पंचमवार यांनी मानले.
सदर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता बांधकामात वापरण्यासाठी जे दगड, गिट्टी वापरली जात आहे. ती देवरी तालुक्यातील देवाटोला पहाडी वरील आहे. येथील गिट्टी ही सिमेंट क्रांकेटच्या रस्त्याकरिता उपयुक्त नसल्याने व माती मिश्रीत असल्यामुळे पाहिजे तसे मजबुती मिळणे कठिण आहे. त्यातच ज्या पहाडीवर या गिट्टीकरिता एम.बी. पाटील कंस्ट्रक्शन कंपनीच्यावतीने ब्लास्टींग करण्यात येत आहे. त्या ब्लास्टींगमुळे मात्र एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवारा धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्लाास्टींगमुळे धरणाच्या पाळीला भेगा पडण्याची भिती व्यक्त करीत ब्लास्टींगची परवानगी देण्यात येवू नये अशा मागणीचे निवेदन त्या जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य दीपकqसह पवार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे सात ते आठ महिन्यापुर्वीच दिले होते. त्या निवेदनाकडेही कंत्राटदार आणि भाजपच्या नेत्यांच्या दबावात जिल्हा प्रशासनाने लक्षच घातले नाही. त्यामुळे कंसट्रक्शन कंपनीचे चांगलेच फावले.