23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ पोहायला गेलेल्या २ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या २ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

0
23
पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल डहाके आणि दिशांत शास्त्रकार अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले बालाजी पाटील माध्यमिक शाळेत आठव्या वर्गात शिकणारी होती. ही मुले त्यांच्या मित्रांसह आमनदीत पोहायला नदीवर गेली होती. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे पोहताना दोघेही प्रवाहात वाहत गेले.
घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र अंधार असल्याने अडचणी येत होत्या. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनेही शोध घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आज सकाळी दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. पोलिसांनी पुढील तपासाची प्रक्रिया सुरु केली आहे.