नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवून निवडणूक प्रकियेत सहभागी व्हावे: जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

0
24

निवडणूक विभागाकडून स्वीप (डतएएझ) अंतर्गत विशेष मोहिम

नवेगाबांध(सतिश कोसरकर),दि.03: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. मतदार हा लोकशाहीचा आत्मा असून एकही मतदार मतदानापासून वंचित राहूनये करीता नविन मतदारांनी आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करावे असे आव्हान नवेगांवबांध येथे २ ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदारयादी वाचन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकडे यांनी केले.
ते पुढे म्हणाल्या की लोकशाहीमधील मतदान प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटकांना समाविष्ट करणे महत्वाचे आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार दिनांक १/१/२०१९ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाकडून १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदारांचे दावे, हरकती, आक्षेप ३१ ऑक्टोबर पर्यंत स्वीकारले जातील. ज्या पात्र मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत तसेच ज्यांनी १ जानेवारी २०१९ रोजी आपले वयाचे १८ वर्ष पूर्ण करतील अशा नविन मतदारांना मतदारयादीत आपले नाव नोंदविता येईल. तसेच १ सप्टेंबर २०१८ पासून निवडणूक विभागाकडून स्वीप (डतएएझ) अंतर्गत विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आदिच्या माध्यमातून १८ वर्ष पूर्ण केलेल्या युवक/युवतींचे नाव मतदारयादीत समाविष्ट केले जात आहे.
सदर कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाडे, तहसिलदार धनंजय देशमुख, सरपंच शहारे,उपसरपंच लांजेवार, ग्राम सचिव प्रामुख्याने उपस्थित होते. २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभेत प्रारुप मतदारयादी वाचन करण्यात आली. सदर मतदारयादीचे शुध्दीकरणाचे काम आक्षेपच्या माध्यमातून सुरु आहे. नमुना ६, ७ ,८ , ८ अ अंतर्गत मतदारयादीत नाव समाविष्ट करणे, मतदार यादीतून नाव वगळने, नावात दुरुस्ती करणे, स्थानांतरण/मृत झालेल्या मतदाराचे नाव वगळने आदि कार्यक्रम या मोहिमेअंतर्गत सुरु आहेत. सदर कार्यक्रमात मतदार नोंदणी अधिकारी, सहा.मतदार नोंदणी अधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.