महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद यात्रेचा पालकमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ 

0
8
गोरेगाव,दि.03ः-संपूर्ण देशात स्वचछतेला घेवून विविध उपक्रम राबविण्यात येत असून विशेषत: केंद्र शासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यानुसार राज्य शासनाच्या वतीनेही स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रा.सु.बडोले यांच्या हस्ते २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती दिनाचे निमीत्ताने महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री रा.सु.बडोले, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, जिप सभापती विश्वजीत डोंगरे, माजी जिप सभापती कुशन घासले, जिप सदस्या शिला चव्हाण, माजी पंस सभापती दिलीप चौधरी, किशोर गौतम, कविता रंगारी, माजी पंस उपसभापती झुमकलाल बिसेन, भाजपा गोरेगाव तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष विजय बिसेन, गुड्डू डोंगरवार, सदाशिव विठ्ठले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नितीन कटरे यांनी केले.