आमगाव(पराग कटरे)दि.05ः-महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना व उपक्रम राबवित असलेले कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कृषि तांत्रिक अधिकारी , डाटा एंट्री ऑपरेटर, यांना 31 जुर्लेनंतर नियुक्ती आदेश न मिळाल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आल्याने पुन्हा आदेश देऊन सेवेत घेण्यासंबधीचे निवेदन आमगाव पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी साबऴे यांना गुरुवारला (दि.4)दिले.
निवेदनात अत्यल्प मानधनावर कार्यरत सदर कर्मचा-याना माहे जुर्ले महिन्यापासुनचे मानधन आणि आॅगष्ट पासूनचे पुनःनियुक्तीचे आदेश मिळाले नाही,
जिल्हा व तालुका पातळीवर मग्रारोहयोची कामे करीत असलेले सर्व सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अभियंता, डाटा ऑपरेटर हे कर्मचारी जिल्हा सेतु समिति जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाचे 11 महिंन्याचे आदेशावर काम करीत असतात 11 महिन्याचे आदेश संपले की लगेच 1 दिवसाचा खंड पाडून पुनःनियुक्तिचा आदेश मिळतो. मात्र यावेळी पहिल्यांदाच 31 जुर्ले रोजी आदेश संपुष्टात आले असून अजुन पर्यत पुनःनियुक्तिचे आदेश मिळाले नाही, मागील मानधन मिळाले नाही.तरीही शासनाची कामे करने नियमित शुरू आहे.मागील मानधन मिळाले नसल्याने कर्मचा-यासह त्याच्यावर निर्भर असलेल्या कुटुबियावर सुद्धा उपासी मरण्याची वेळ येऊन ठेपल्याच उल्लेख करण्यात आला आहे.





