महापुरुषांच्या चरित्रग्रंथाचा अभ्यास करा-डाॅ.बोपचे

0
9

मोहाडी येथील आदर्श वाचनालयाचा 37 वा वर्धापनदिन उत्साहात

गोरेगाव,दि.05ः- तालुक्यातील आदर्श सार्वजनिक वाचनालय माेहाडी ( “अ” वर्ग तालुका ग्रंथालय) येथे महात्मा गांधी यांच्या 150 व्या व लालबहादुर शास्त्री यांच्या 114 व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालयाचा 37 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डाॅ. खुशालचंद्र बाेपचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी खाेमेन्द्र बाेपचे,ओबीसी संघटनेचे संघटक डाॅ.गुरुदास येडेवार, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य बी.एम.करमकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. खुशालचंद्र बाेपचे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अभ्यास करुन त्यांच्यासारखे महान बनण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मनाशी वाळगले पाहिजे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्गीयासाठी भारतीय राज्यघटनेत नमुद केलेली प्रतिनिधीत्वाची बाब समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या पुस्तकाचेही अभ्यास सर्वांनी केले तर बाबासाहेबांनी ओबीसीसांठी किती चांगले कार्य केले हे नक्कीच कळेल.यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य करमकर यांनी ग्रंथालयातील ग्रंथाचे वाचन करुन आपले थोरपुरुष महान व्यक्ती बनलेले आहेत.त्यामुळे युवा पिढीने वाचनाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे.तर डाॅ.येडेवार यांनी वाचनाची आवड ज्याच्या अंगी असेल तो विद्यार्थी स्पर्धेच्या कुठल्या कठिण परिक्षेत अपयशी होऊ शकत नाही.तर भारतीय राज्यघटना हे आपल्या सर्वासांठी राजग्रंथ असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी खाेमेन्द्र बाेपचे म्हणाले की महात्मा गांधीनी सत्य, अंहिसाच्या मार्गाने चालण्याचा संदेश दिला तसेच ग्राम स्वच्छता अभियान राबवावे. खेडयाकडे चला, आदि गाेष्ट सांगितल्या. लाल बहादुर शास्त्रीनी ‘जय जवान, जय किसान चा नारा दिला.त्याचा उपयोग समाजासाठी व्हायला हवे.

कार्यक्रमाला माजी उपसरपंच श्रीरामजी पारधी,तमुस अध्यक्ष याेगराज भाेयर,पोलीस पाटील केशाेराव डाेहळे,ग. तु. पटले,मदनलाल बघेले,रविन्द्र सार्वजनिक वाचनालय सचिव बी.बी.बहेकार,गिधाडीचे पोलीस पाटील पुरुषाेतम बहेकार उपस्थित कार्यक्रम पार पडले.प्रस्ताविक आदर्श वाचनालयाचे सचिव वाय.डी.चाैरागडे यांनी 37 वर्षातील ग्रंथालयाच्या विकासाचा अहवाल सादर केला. संचालन कोषाध्यक्ष डि.आर.चाैरागडे यानी केले तर आभार जे. जे. पटले यांनी मानले.यशस्विते साठा नरेन्द्रकुमार चाैरागडे, तुषार डाेगंरे, दुर्गेश चेचाने, प्रविन येरखडे, लिखीराम चाैरीवार यांनी सहकार्य केले.