24.2 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ ठेवीदार व ग्राहकांच्या सहकार्याने बँक प्रगतीपथावर-महेशकुमार जैन

ठेवीदार व ग्राहकांच्या सहकार्याने बँक प्रगतीपथावर-महेशकुमार जैन

0
31

भंडारा,दि.05ः- सभासद ठेवीदार व ग्राहकवर्गाच्या सहकार्यामुळे दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने २0१७-१८ या आर्थिक वर्षात आर्थीक मंदी व व्यापार जगातील अनेक अडचणीवर मात करीत बँकेच्या संचालक व कर्मचार्‍यांच्या पर्शिमामुळे व कर्जदार सभासदांनी दिलेल्या सहकायार्मुळे बँक प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जैन यांनी व्यक्त केले.
दि. भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगलमुर्ती सभागृह, खात रोड भंडारा येथे गुरूवारी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी आ. चरण वाघमारे, माजी आ. आनंदराव वंजारी, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलालजी चौधरी, गोंदिया जिल्हा मजुर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष झामसींग येरणे, जिल्हा बँकेचे संचालक रामराव कारेमोरे, श्रीकांत वैरागडे, प्रशांत पवार, नरेंद्र बुरडे, होमराज कापगते, गीता हलमारे तसेच देवीदास लांजेवार, प्रशांत लांजेवार, अँड. धनराज खोब्रागडे, धनराज साठवणे, सुभाष आकरे, बँकेचे माजी संचालक धनंजय ढगे, धनंजय गाडगीळ, प्रबंधन संस्थेचे प्रशिक्षक अँड. प्रशांत शिरके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सभेत सभासदांचे ४३ पाल्यांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवुन सत्कार करण्यांत आला.
पुढे जैन म्हणाले की, मागील आर्थीक वर्षाचे तुलनेत बँकेचे ग्रॉस एनपीए २.२९ ने नी कमी होवुन ग्रॉस एनपीएचे प्रमाण ८.५५: राखण्यात यश आले आहे. सन २0१७-१८ मध्ये बँकेला १.५१ कोटींचा नफा झाला असून निव्वळ नफ्याच्या ५२ लाष १, २ बॅकेच्या सभासदांना देण्यात आले. हे सर्व बॅकेचे सभासद व ग्राहक व सर्व कर्मचार्‍यांच्या सहकायार्मुळे झाल्याचे गौरवोद्वार त्यांनी काढले.
सभेला बँकेचे संचालक सर्व हिरालाल बागंडकर, उपाध्यक्ष, व संचालक नाना पंचबुध्दे, अँड. श्री. जयंत वैरागडे, गोपीचंद थावानी, विलासजी काटेखाये, डॉ. जगदिश निबांर्ते, पाडुरंग खाटीक, दिनेश गिर्‍हेपुंजे, उध्दव डोरले, महेंद्र गडकरी, हेमंत महाकाळकर, लिलाधर वाडीभस्मे, अँड विनयमोहन पशिने, सुमीत हेडा व संचालिका कविता लांजेवार व मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश मदान उपस्थित होते. सभेच्या यशस्वितेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश मदान, व्यवस्थापक ए.आर. घरत, व्ही.डब्लु. चवडे, आर.व्ही. मेर्शाम, श्री.पी.बी. बावने, व्ही.एस. भोंगाडे, पी.आर. हार्डीकर, बी.के. कारेमोरे तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष हिरालाल बागंडकर यांनी मानले.