25.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ सेवानिव्रृत्त पोलीस पाटलांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न

सेवानिव्रृत्त पोलीस पाटलांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न

0
33

अर्जुनी मोरगाव,दि.08ः- म.रा.गा.का.पोलीस पाटील संघटना अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया शाखेच्या वतीने नुकतेच सेवानिव्रूत्त झालेले पोलीस पाटील सितारामजी नाकाडे व  श्रीरामजी आकरे आणि हेडमोहर्रर दिवाकरजी शहारे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
पोलीस पाटील हा शासन, प्रशासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे. पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्याने पोलीस पाटील संघटनेने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्या कार्यक्रमाला पोलीस निरिक्षक मनोहर बुराडे साहेब व नवनियुक्त हेडमोहर्रर  शेंडे यांच्या हस्ते सेवानिव्रृत्त पोलीस पाटील सितारामजी वानाजी नाकाडे व  श्रीरामजी रुषीजी आकरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बदली होऊन जात असलेले “हेडमोहर्रर दिवाकरजी शहारे यांचा सपत्नीक” पो.पा.संघटनेचे अध्यक्ष श्रीधरजी लंजे व पदाधिकारी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.यावेळी गायत्री पवार (जिल्हा सहसचिव)मधुकरजी पर्वते (शाखा सचिव),सर्वश्री. राष्ट्रपाल भोवते, संतोष डोंगरवार, सौ. हेमलता देशमुख, रमेश झोळे, नाशिक कापगते, सुनंदा शिवनकर, बनकर, हनवंत बारशे, मधुकर तरोणे, मंगला रामटेके, टिकाराम बंसोड व अन्य पोलीस पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास यथायोग्य सहकार्य केले.प्रास्ताविक जयप्रकाशजी लाडे (खामखुरा) यांनी केले.संचालन डाकराम मेंढे (शाखा उपाध्यक्ष) यांनी तर आभार- नेमीचंद मेश्राम (खांबी)यांनी मानले.

blank