23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ १५ ते १८ ऑक्टोंबर राहुरी येथे किसान आधार संमेलन

१५ ते १८ ऑक्टोंबर राहुरी येथे किसान आधार संमेलन

0
35

वाशिम, दि. १० : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहे. विद्यापीठाचा सुवर्ण जयंती महोत्सव या निमित्ताने साजरा करण्यात येणार आहे. कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त वतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे १५ ते १८ ऑक्टोंबर दरम्यान किसान आधार संमेलन आयोजित केले आहे. या दरम्यान कृषि प्रदर्शन, पशु प्रदर्शन, विविध विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनास भेट देवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचेकडे १२ ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावे. आधारकार्ड, पासबुक झेरॉक्ससह सातबारा सोबत जोडावा.