30.4 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ जि.प.तर्फे पारधी कुटुंबाला आर्थिक मदत

जि.प.तर्फे पारधी कुटुंबाला आर्थिक मदत

0
19

तिरोडा,दि.15 : तालुक्यातील ठाणेगाव येथील अनिल बाळकृष्ण पारधी यांच्या घराला व गायीच्या गोठ्याला १६ ऑगस्ट रोजी अचानक आग लागली. त्यामुळे पारधी कुटुंबीयाला आर्थिक मदत म्हणून जि.प.च्या वतीने २० हजार रुपयांचा धनादेश जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे या सुध्दा उपस्थित होत्या. ठाणेगाव निवासी अनिल पारधी यांच्या घराला व गोठ्याला आग लागल्याने आगीत तणसाचे २०० पेट जळले तसेच शेतीकरिता लागणारे सर्व अवजारे जळून भस्म झाले आणि त्यात गाय व शेळी मृत्यू पावले होते. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्याकरिता विनंती केली. पारधी कुटुंबीयाने सादर केलेल्या दस्तऐवजाची तपासणी करून संबंधितास जिल्हा परिषद मार्फत आपत्कालीन अर्थसाहाय्यामधून २० हजार रुपयांची आर्थिक साहाय्यभूत मदत करण्यात आली आहे..