फुलचूर तंमुसच्या अध्यक्षपदी राजेश अंबुले;ग्राम सभेत निर्विरोध निवड

0
9
गोंदिया,दि.23ःःनजीकच्या फुलचूर ग्राम पंचायत कार्यालयात  विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्याअध्यक्षस्थानी माजी उपसरपंच अशोक चन्ने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच लक्ष्मीबाई मनोहर कटरे, उपसरपंच आशादेवी विजय मेश्राम, माजी तंमुस अध्यक्ष शिवनारायण नागपुरे, माजी तंमुस अध्यक्ष सेवकराम बंसोड, संत गाडगेबाबा समिती अध्यक्ष मनिष बैस उपस्थित होते. ग्रामसभेत विविध विकास कामावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासन निर्णयनुसार महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे एक तृतीयांश सदस्य बदलून नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. दरम्यान तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजेश अंबुले यांची एकमताने सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच ग्रामविकास अधिकारी टि.डी.बिसेन यांची समितीचे निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली.
याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य महेशकुमार अंबुले, गुणराज ठाकरे, देवचंद बिसेन, मिना देवगडे, सुशिला कवास, दुर्गाप्रसाद नागपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार हरिणखेडे, ग्रामविकास अधिकारी टी.डी. बिसेन, सुभाषराव रहांगडाले, ताराचंद नागपुरे, छबिलाल पटले, विजय मेश्राम, शांताराम राउत, मोनू पारधी, सोनू बघेले, राजु चौधरी, पप्पू बिसेन, वनमाला मेश्राम, तेजराम भांडारकर, महेश नेवारे, रानी बैस, उर्मिला नागपुरे, रजनी कापसे, कल्पना कुंभलवार, लिपीक उमेश राउत, सुनिल लिल्हारे, राजेश राउत, अर्चना चौधरी उपस्थित होते. सभेनंतर उपस्थित ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम विकास अधिकारी टी.डी. बिसेन यांचे ४५ व्या वाढदिवसाचे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. तंमुस अध्यक्ष रमेश अंबुले यांची निवड झाल्याबद्दल फुलचूरचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व प्रतिष्ठीत नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. फुलचूर गावाच्या विकासात हातभार गावाला तंटामुक्त ठेवण्यास हातभार लावण्याचे आश्वासन अंबुले यांनी दिले.