नागपूर व गडचिरोली विद्यापीठातील पोवार प्राध्यापकांचा स्नेहमिलन मेळावा

0
10

गोंदिया,दि.23ःनागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत पोवार समाजातील प्राध्यापकांचा स्नेहमिलन मेळावा रविवारला कोहमारा येथे पार पडला.या मेळाव्यात पुर्व विदर्भातील 40 च्या जवळपास प्राध्यापक सहभागी झाले होते.या मेळाव्यात सर्व प्राध्यापकांनी मासिक वर्गणी स्वरुपात काही रक्कम दरमहिन्याला गोळा करुन समाजातील होतकरु विद्यार्थ्यासाठी व समाजासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.या मेळाव्यात प्रा.डाॅ.संजिव रहागंडाले,डाॅ.देवेंद्र बिसेन,डाॅ.पी.के.रहागंडाले,डाॅ.जी.के.भगत,डाॅ.दिलीप चौधरी,डाॅ.साहेबलाल भैरम,प्रा.जे.आय.ठाकूर,डाॅ.मनोज पटले,डाॅ.राम चौधरी,ओ.आय.ठाकूर,जे.बी.बघेले,सौ.डाॅ.राणे,राजकुमार पटले,शशी बिसेन,डाॅ.व्ही.आय.राणे.डाॅ.फुंडे,प्रा.बोपचे,प्रा.तुरकर,प्रा.रहागंडाले,प्रा.बिसेन,प्रा.राणे,प्रा.कटरे आदी दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.दोन्ही विद्यापीठातील पोवार प्राध्यापकांचा हा पहिला स्नेहमिलन मेळावा देवेंद्र बिसेन यांच्या फार्महाऊस येथे उत्साहात पार पडला.