26.3 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहेरी तालुका अध्यक्षपदी प्रशांत ठेपाले

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहेरी तालुका अध्यक्षपदी प्रशांत ठेपाले

0
34

अहेरी,दि.24ः- आलापल्ली येथील वनविभाग विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक गडचिरोली श्रीधर दुग्गीरालापाठी,ओमप्रकाश चुनारकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य इसरार शेख यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अहेरी शाखेची कार्यकारीणी गठित करण्यात आली.यावेळी अहेरी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.उपस्थितांच्या सम्मतींने अहेरी तालुका अध्यक्ष म्हणून प्रशांत ठेपाले यांची निवड करण्यात आली.तर सचिव शंकर मेश्राम,कोषाध्यक्ष स्वप्नील तावाडे,उपाध्यक्ष असिफ खान,उपाध्यक्ष अनिल गुरनुले,तालुका संघटक मिलिंद खोंड,सहसचिव सतीश दैदावार,प्रसिध्दी प्रमुख स्वप्नील श्रीरामवार यांची निवड करण्यात आली.यावेळी संतोष बोम्मावार,सुनील तुरकर,दिपक सूनतकर,रफिक पठाण,अखिल कोलपकवार,भास्कर तलांडे,सेवा वाकडोतपवार,महेश येर्रावार,उमेश भीमपनल्लीवार,मधुकर गोंगले,डॉक्टर दुर्गे,अमोल मारकवार,विस्तारी गंगाधरीवार,सचिन ओलेटीवार,उमेश पेंडयाला,संदीप रेपालवार यांची उपस्थिती होती