नागपुरातील अनधिकृत १० धार्मिक स्थळे पाडली

0
12

नागपूर,दि.31 : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्रतर्फे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्र कार्यक्षेत्रातील पूर्व नागपुरातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागेवरील १० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली.
यात पुनापूर भागातील तीन हनुमान मंदिर,नागोबा मंदिर,दोन शिवमंदिर,पुनापूर, नागराज मंदिर, भरतवाडा येथील नाग व शिवमंदिर, संतोषी माता मंदिर आदी अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत या ठिकाणचे अतिक्रमण काढले. सकाळी ११ ते सायकांळी ५ वाजेपर्यंत नासुप्रतर्फे ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता (पूर्व) संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी (पूर्व) भरत मुंडले, कनिष्ठ अभियंता अविनाश घोगले, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील तसेच कळमना पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली.