मधुकर कांबळे यांचा दौरा कार्यक्रम

0
8

वाशिम, दि. ०: साहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे हे 6 नोव्हेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शासकीय वाहनाने विश्रामगृह अकोला येथून मोटारीने मालेगांवमार्गे वाशिमकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन, सकाळी 11 वाजता स्थानिक कार्यकर्ते यांचे समवेत बैठक, सकाळी 11.45 वाजता शासकीय वाहनाने विश्रामगृह वाशिम येथून राजेगांवकडे प्रयाण. दुपारी 12.05 वाजता राजेगांव येथे आगमन व स्थानिक कार्यकर्ते यांचेसोबत चर्चा. दुपारी 12.35 वाजता राजेगांव येथून मंगरुळपीरकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह मंगरुळपीर येथे आगमन व स्थानिक कार्यकर्ते यांचे समवेत बैठक. दुपारी 4 वाजता शासकीय वाहनाने मालेगांवमार्गे अकोलाकडे प्रयाण करतील.