24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ बौध्द धर्म आनंदी जीवनाचा खरा मार्ग : विनोद अग्रवाल

बौध्द धर्म आनंदी जीवनाचा खरा मार्ग : विनोद अग्रवाल

0
42

गोंदिया,दि.05 : बौध्द धर्म हा समता, ममता, मानवता, बंधुता, न्यायावर आधारीत धर्म आहे. या धर्मातील पंचशीलाचे पालन व अष्टांगमार्ग आचरणात आणून आनंदी जीवन जगण्याचे मर्म सामावले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील घिवारी येथील लुम्बिनी बौध्द विहारात २६ ऑक्टोबर रोजी आयोजित ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व चावडी बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौध्द समाजाचे अध्यक्ष विजय भालाधरे होते. याप्रसंगी सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन करण्यात आली. पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले, एक श्रीमंत किंवा एक राजा गरीब होऊ शकतो, परंतु एक शिक्षित इसम कधीही गरीब होऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या जीवन कार्यातून हाच संदेश जगाला मिळाला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करुन गरीबी, अन्याय, बेरोजगारी दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ‘जगाला शांती संदेश देणार्या महामानवाला कोटी कोटी नमन अशा शब्दात बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. दरम्यान लुम्बिनी बौध्द विहाराजवळ चावडी बांधकामाचे भूमिपूजन विनोद अग्रवाल यांनी केले.यावेळी सरपंच राजू कटरे, दीपक डहाट, ओमप्रकाश पटले, रंजीत वासनिक, शिशूपाल बंसोड, राजेश मेश्राम, एन.एल. मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान सप्तखंरेजीवादक तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम पार पडला.

blank