जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बèहाटे निलबिंत

0
10
गोंदिया,दि.१4- गोंदिया जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब सावळेराम बèहाटे यांना अहमदनगर येथील प्रकरणात शासनाने निलबिंत केल्याचे पुणे येथील कृषी सहसंचालक ना.तु.शिसोदे यांनी नागपूर विभागीय कृषी संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.शिसोदे यांच्या ३ नोव्हेंबरच्या पत्रानुसार बèहाटे यांना तत्काळ निलबिंत करण्याच्या आदेशाची अमलबजावणी करुन माहिती देण्यासंबधीचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालकांना दिले होते.अहमदनगर येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी असतांना बèहाटे यांच्यावर कोट्यावधी रुपयाच्या शासकीय योजनेतील निधीचा अपहाराचा ठपका ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे गोंदिया येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहिलेले अनिल इंगळे यांची बदली अमरावती येथे झाली.इंगळे यांना मात्र तेथील जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असून शासकीय कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे नमुद करीत इंगळेंना शासनाने परत बोलवावे अशा अहवाल पाठविल्याची माहिती समोर आली आहे.