सालेकसा येथे झाडीबोली विचारमंथन व मिलिंद रंगारी यांचा सत्कार

0
11
सालेकसा,दि.14ः- सालेकसा म्हणजे  महाराष्ट्राचे पूर्व टोक याच भागात  नांदते ती झाडीबोली  या बोलीचे संरक्षण आज काळाची गरज आहे.बोलीच्या विकासावरच भाषेचे भवितव्य अवलंबून असते. म्हणून बोली टिकली पाहिजे !  सार्वजनिक साक्षरता वाचनालय (आमगावखुर्द) सालेकसा येथे आयोजित ज्येष्ठ साहित्यिक  सुन्हेरसिंग ताराम यांच्या श्रद्धांजली च्या कार्यक्रमानिमित्त झाडीबोली विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सुन्हेरसिंग  ताराम  यांना श्रद्धांजली वाहून उपस्थितांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाप्रसंगी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 26 वे झाडीबोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्राध्यापक मिलिंद रंगारी यांची निवड झाल्याबद्दल  त्यांचा झाडीबोली शाखा सालेकसा तर्फे उपस्थित अतिथींच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून किरण मोरे, पुंडलिक हटवार,सुरेश राहांगडाले, पवन पाथोडे यांनी समाज जागृती पर कविता सादर केल्या.
          सुन्हेरसिंग ताराम हे आदिवासींचे खरे अभ्यासक होते. “गोंडवानादर्शन” चे ते मुख्य संपादक होते. गोडवाना दर्शन च्या माध्यमातून भारतातील आदिवासींच्या मनात खरी जागर जाणीव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आदिवासींच्या अभ्यासार्थ आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी लावलं असे वक्तव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम यांनी केले. यावेळी प्राध्यापक मिलिंद रंगारी, सार्वजनिक साक्षरता वाचनालयाचे संस्थापक नेपाल जी पटले, ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुका अध्यक्ष  मनोज  डोये,  गोटुल आदिवासी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा  वंदनाताई मेश्राम, कृष्णा मेंढे, मनोहरजी कटरे, रमेशजी सोनवाने,सताली शेडमाके,राहुल हटवार,मधुकर हरिणखेडे,राजेंद्र बिसेन, यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
            कार्यक्रमाचे संचालन व आभार पवन पाथोडे यांनी मानले तर  यशस्वितेसाठी ध्रुवकुमार हुकरे, अमित वैद्य, विजय उईके, रूपाली भीमटे, साहिल मोरे यांनी व झाडीबोली  साहित्य मंडळ शाखा सालेकसा चे पदाधिकारी, सार्वजनिक साक्षरता वाचनालय आमगाव खुर्दचे कर्मचारी, गोटुल बहुद्देशीय आदिवासी  संस्था सालेकसा चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.