विनोद नाकाडे यांना मातृशोक

0
8

अर्जुनी मोरगाव,दि.17ः- तालुक्यातील ताडगांव येथील रहिवासी कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्ते विनोद नाकाडे यांच्या मातोश्री सरिताताई यशवंतजी नाकाडे यांचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ९:१५ वाजता दीर्घ आजाराने ताडगांव येथे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता ताडगाव मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शोकसभेला भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, माजी जिप उपाध्यक्षा रचना गहाणे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.