आदिवासी समाजाने रुढी परंपरा विसरू नये-जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडलवार

0
17

गडचिरोली,दि.17ः- जिल्ह्यातील गुड्डडीगुडम येथे जननायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले.या सोहळ्यात 18 जोडपी विवाहबध्द झाली.कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलतांना जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडलवार यांनी आज आदिवासी समाज एकत्र येत असून आदिवासीची संस्कॄती,रुढी,परंपरा हि सर्व समाजापेक्षा वेगळी अाहे.आदिवासी हे निसर्गपूजक असून अनंत काळापासून जंगलाचे रक्षण करीत आहेत.जंगलातील वेगवेगळ्या झाडांची पूजा करतानाच सुशिक्षित व कर्मचारी वर्ग आज आपली संस्कॄती विसरत चालला आहे.बाहेर जाऊन दुसऱ्या समाजाच प्रभावाने स्वतःची बोलीभाषा,रहनसहन देवीदेवताना विसरत आहेत.ते विसरता कामा नये आज आदिवासीची एक वेगळीच ओळख तयार होत असून आपल्या पूर्वजांप्रमाणे आपणही आपली संस्कॄती,रुढी ,परंपरा,बोलीभाषा टिकवून ठेवणे  काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

गुड्डडीगुड्म ग्रामसभानी या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा आयोजीत करून आदिवासी परंपरा रीति रिवाजानुसार या ठीकाणी लग्न सोहळा पार पडत आहे.हे अत्यंत गौरवस्पंद बाब आहे.आज काही समाजकांटकाकडून स्वतःची राजकीय पोडी बजन्यासाठी समाजाच्या वापर करीत आहेत त्याच्यापासून सावध राहून,आपली संस्कॄती अबाधित ठेवणे गरजेचे असल्याचे  विचार यावेळी कंकडलवार यांनी व्यक्त केले.सामूहिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तिमरम सरपंच महेश मडावी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरीचे पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,आलापली माजी सरपंच विजय कुसनाके,तिमरमचे उपसरपंच शशिकला पेंदाम,निलेश मडावी,रमाकांत पेंदाम,इंदूताई पेंदाम,रंजना सड़मेक,संगीता आत्राम,प्रफुल्ल नागुलवार,शोभा ओंनापाकला,व परिसरातील  जिमेला, नंदीगांव, निमालगुड्म,राजाराम, गोल्लाकरजी, आदि गावातील सर्व आदिवासी समाजाचे स्त्री, पुरुष मोठ्या संख्याने उपस्थित होते.