आ.फुकेंच्या हस्ते सिंधीबांधवाना पट्यांचे वितरण

0
17

गोंदिया,दि.२३ःमागील ७० वर्षापासून पट्याच्या प्रतिक्षेत असलेल्या qसधी समाजबांधवाना अतिक्रमीत जागेच्या पट्याचे वितरण भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,नगराध्यक्ष,उपाध्यक्ष शिव शर्मा,स्थायी समिती सदस्य विक्की कुकरेजा,नगरसेवक दिलीप गोपलानी,सेवकारम पृथ्यांनी,उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,मनोहर आसवानी,होतचंद छतवानी,हरिराम आसवानी,निरंजन चांदवानी,अशोक जयqसघानी व राजू नोतानी उपस्थित होते.यावेळी १०६ जणांना जमिनीचे पट्टे वितरीत करण्यात आले.आमदार फुके यांनी बोलतांना qसधी समाजबांधवाना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच गेल्या ७० वर्षात जे झाले नाही ते आता झाले असे सांगत उर्वरित ज्यांना पट्टे मिळालेले नाहीत त्यांनाही लवकरच त्रुटया पुर्ण करुन देण्यात येतील असे सांगितले.