माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचे निधन

0
13

तुमसर,दि.28ः- माजी आमदार नारायणरावजी कारेमोरे यांचे जेष्ठ सुपुत्र व काँग्रेस युवा नेते पंकजभाऊ कारेमोरे यांचे वडील माजी आमदार सुभाषचंद्र नारायणरावजी कारेमोरे यांचे आज बुधवारला(दि.28) नागपूर येथे रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले.त्यांनी तुमसर विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते.त्यांच्यावर उद्या गुरुवारला दुपारी १२ वाजता कोष्टी नदीकाठावर(घाट) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.ते मृत्यूसमयी 84 वर्षाचे होते.
क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक विकासकामे करून गोरगरिब आणि विशेषता आदिवासी समाजात आपली एक वेगळी ओळख कायम करुन त्यांच्या हृदयात आपले नाव कोरून घेतले.तेअष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.क्षेत्राचा विकास आणि गरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सरकारसी अनेक वेळा संघर्ष केले.आपल्या मतदार संघावर सरकारचे दुर्लक्ष पाहुन त्यांनी भरल्या अधिवेशनात सभागृहात आपल्या पायाची चप्पल थेट मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर फेकून मारली आणि आपल्या मतदारसंघाकडे सरकार सकट सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.