शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, प्रकृती गंभीर

0
12

बुलडाणा,दि.29 – शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.28) रात्री उशिरा घाटबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत मोहना बुद्रुक येथे घडली आहे. मेहकर तालुक्यातील ग्राम मोहना बुद्रुक येथील रहिवासी तुकाराम वासू जाधव (वय 52) हे बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून घराकडे परत येत असतांना अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. त्या ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर व पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सदर घटनेनंतर तात्काळ त्यांना इतर शेतकऱ्यांनी जानेफळ येथील आरोग्य केंद्रात आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा साठी त्यांना मेहकरला हलविण्यात आले आहे.