पितांबरटोल्यात ग्रामीण जीवन्नोत्ती कार्यशाळा

0
12
देवरी,दि.07ः- भारतीय वन्यजीव न्यास अंतर्गत नागझिरा नवेगांव बफर झोनमधील गावांच्या नागरिकांसाठी देवरी तालुक्यातील पितांबरटोला येथे कार्यशाळेचे आयोजन करुन माहिती देण्यात आली.तसेच वनसर्वंधनासोबतच वन्यजीव सरक्षंणावर मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यशाळेला 14 गावातील 26 महिला बचत गटाच्या  150 महिला उपस्थित होत्या.विदर्भ वाघ प्रकल्प अंतर्गत शाश्वत पद्धतीने  विभिन्न वस्तु तयार कसे केले जातात.जंगल तोड कमी करण्यासाठी उन्नत चूल्हा, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे यावर माहिती देण्यात आली. वन्यजीव विभागाच्या सहाय्यक वनसरंक्षक डॉ.प्रिया मस्के,विभागीय प्रमुख इंदु कुमारी,वनअधिकारी रोशन राठोड़,प्रबंधक अनिल नायर,तालुका अभियान व्यवस्थापक मोहबंशी,सडक अर्जुनीचे लंजे व क्षेत्रीय प्रबंधक प्रफुल भांभूळकर उपस्थित होते. कार्यशाळेला अरशद हुसेन,मनीषा असरफ,सौ.वालदे,हिवराज राऊत, नितिन रावते ,संजय घासले,जितू कटरे,नूर अली व गावकरी उपस्थित होते.