24 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ घोटी येथे स्वच्छ अभियान व शालेय रॅली

घोटी येथे स्वच्छ अभियान व शालेय रॅली

0
27

सडक अर्जुनी,दि.08- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा साठी सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी येथे आज 8 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून गांवात जनजागृती करून श्रमदान करण्यात आले. यावेळी सरपंच दिनेश कोरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील विविध समिती सदस्य यांनी गावांत स्वच्छता अभियान राबविले. यावेळी सरपंच कोरे यांनी सदर अभियानाला गावातील प्रत्येक नागरिकाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

blank