स्थानिक गुन्हे शाखेचा ५ क्रिकेटबुकींच्या अड्यावर छापा,सुमारे ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
8

गोंदिया,दि.०8-गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यात क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टा व्यवसाय चालविणारे मोठमोठे बुकी गोंदिया शहरात वावरत आहेत.ते बुकी मात्र पांढरपेशे असल्याने त्यांच्यावर कुणीही सामान्य नागरीक हे क्रिकेटचे बुकी असतील अशा कधीही विश्वास करणार नाहीत.अशापैकी ५ क्रिकेटबुंकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा घालून ३ लाख ९७ हजार ८७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई ०७ डिसेंबरला सिव्हील लाईन स्थित फेंडारकर वार्डातील मुकेश जगदीशप्रसाद शुक्ला यांच्या राहत्या घरातील वरच्या माळ्यावर करण्यात आली.छापा घालण्यात आला तेव्हा पोलीसांनी आमीन खान कलीम खान पठाण ऊर्फ हिरू.अजरुद्दीन अजमुद्दीन गोरी,ताहीर अख्तार शेख ,मनिष श्रीवास्तव व मोहसीन रफिक शेख यांना मोबाईलवर सट्टा खेळतांना रंगेहाथ पकडले.त्यावेळी जोजी विरुध्द डर्बन साऊथ आफ्रिकन टि २० क्रिकेट मॅचवर लॅपटॉप,qप्रटर,मोबाईल फोन व इतर साहित्याच्या माध्यमातून मोबाईल पेटीतील मोबाईलवरुन लोकांशी संवाद साधून क्रिकेट सामन्यावर पैशाची बोली लावून सट्टा खेळत असल्याचे आढळून आले.त्यावेळी त्यांच्याकडून १ लॅपटॉप,४२ मोबाईल फोन,१ qप्रटर,एक मोबाईल लाईन पेटी तसेच जुगाराचे ४७४० रुपये रोख असे ३ लाख ९७ हजार ८७५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणात वरील आरोपीसंह इतर ६ व्यक्तिविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनकर ठोसरे,सपोनि रमेश गर्जे,प्रमोद बघेले,पोलीस कर्मचारी राजकुमार पाचे,विनय शेंडे,विजय रहागंडाले,सुखदेव राऊत,लिलेंद्र बैस,चंद्रकांत कर्पे,गोपाल कापगते,तुलसीदास लुटे,भुवनलाल देशमुख,रेखलाल गौतम,सुजाता गेडाम,विनोद गौतम यांनी पार पाडली.पोलीस अधिक्षक हरिष बैजल व अति.पोलीस अधिक्षक संदिप आटोळे यांनी सदर पथकाचे अभिनंदन केले आहे.