कामधेनू प्रकल्पांतर्गत वंधत्व निवारण व आरोग्य शिबिराचे मोफत आयोजन

0
16

तिरोडा,दि.०९: अदानी फाउंडेशन द्वारा तिरोडा तालुक्यातील एकुण २७ गावांमध्ये जास्त दुध देणाèया देशी गोवंश वाढीकरिता कामधेनू प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्देश पशु पालकांचे उत्पन्न वाढावे व जनावरांना सहज आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हा आहे. या माध्यमातून पशु पालकांना मोफत घरपोच कृत्रीम रेतन सेवा, गर्भधारणा तपासणी, चारा प्रात्याकक्षिक तसेच मोफत वंधत्व निवारण व आरोग्य शिविर या सारख्या सेवा पुरविण्यात येतात.तालुक्यातील बेरडीपार, बरबसपुरा, पालडोंगरी व मरारटोला या चार गावांमध्ये नुकतेच वंधत्व निवारण व आरोग्य शिबिराचे मोफत आयोजन पशुधन विभागाचे सहकार्यने करण्यात आले होते. याअंतर्गत एकुण चार गावातील २१९ पशुपालकांच्या गाई-१७८, बैल-२४१, म्हैस-१२८, शेळी-२१४, वासरे-६१ असे एकूण ८२२ पशुंची मोफत आरोग्य तापसणी व औषधी वितरण करण्यात आले.