मॉडेल कॉन्वेंट एन्ड कनिष्ठ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिवस साजरा

0
12

गोरेगाव,दि.०९: स्थानीय मॉडेल कॉन्वेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक़्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी एस.आर,कटरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सी.पी.मेश्राम, तुरकर, राऊत उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक़्रमात विद्याथ्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अनेक विद्याथ्र्यांनी गीते सादर केली. रामेश्वर कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्याथ्र्यांना आाजच्या दिवसाची जाणीव करुन दिली. मेश्राम यांनी विद्याथ्र्यांना बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन दिशा कटरे, शुभांगी पटले यांनी केले. आभार दिव्या चौधरी हिने मानले.