आदिवासी हलबी-हलबी समाजच्या परिचय सोहळ्यात युवक-युवतींनी दिला परिचय

0
15

गोेरेगाव,दि.०९: आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या आदर्श (सामुहिक) विवाह समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या उववर-वधू परिचय मेळाव्यात अनेक युवक-युवतीनी सहभागी होत परिचय करुन दिला.तसेच आपली माहिती पत्रकात भरुन परिचय यावेळी दिले. यात मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातून गडचिरोली, नागपृर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर या सारख्या जिलह्यातून युवक-युवती सुद्धा या परिचय सोहळ्यात उच्च शिक्षीत पदवीधर, पदवी, शेतकरी, मजूर व्यवसायीक या परिचय सोहळ्यात सहभागी झालेले होते.
या परिचय सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक डॉ.एन.डी. किरसा यांच्या मार्गदर्शनातून होत असते. यावेळी कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती व आदिवासी हलबा-हलबा समाज संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्रावण राणा, तर उद्घाटक म्हणून माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, जे.टी. दिघारे, शिवलाल गावळ, माजी तहसीलदार खुशाल सुरमोडे, पं.स.गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, सालेकसाचे तहसीलदार सी.आर. भंडारी, अर्जुनी-मोरगावचे अभियंता सुभाष घरतकर सह अनेक आदिवासी बांधव, महिला या सोहळ्यात सहभागी झाले होते.
सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सचिव अजय कोठेवार, विरेंद्रqसह चाकरे, एच.बी.राऊत, जी.एस. खांडवाये, तेजराम बिसेन, सुभाष चुलपार, शिवानंद फरदे, केशव चवादे, झामqसग भोयर, मनोहर कोठेवार, ललीत चुलपार, धमेंद्र राऊत, रqवद्र मुंगडे, राजेंद्र कृपाण, परमानंद चुलपार, शिवशंकर राऊत, संजय धानगाये, छगन राऊत, विलेश येल्ले, संजय घासले, ओमप्रकाश चाकाटे आqदनी सहकार्य केले.