सडक/अर्जुनी,दि.10ः- सडक/अर्जुनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे पाटील यांच्या आदेशानुसार,गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष आलोक मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त व सोनीयाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनी/मोर. विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने भव्य तालुका स्तरीय चिञकला स्पर्धेचे आयोजन जि.प. प्राथमिक शाळा कोदामेडी येथे ०९ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आले होते.
पंडीत नेहरु यांचे योगदान देशाप्रती काय होते हे आजच्या पिढीला ज्ञात राहावे या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने सदर स्पर्धा आखण्यात आली होती.ज्याचे यशस्वी आयोजन अर्जुनी/मोर.विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत राऊत यांनी केले.विद्यार्थ्यांना विविधतेतुन एकता या विषयावर चिञ काढायचा होता.सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग दर्शवीला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना उत्तम बक्षिसे व प्रमाणपञे देण्यात येणार असुन यावेळी अर्जुनी/मोर. विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत राऊत,शाला व्यवस्थापन समीती च्या अध्यक्षा सवीता बनकर, युवक काँग्रेसचे महेश सोनवाने,शैलेस शेलारे,निलेश लाडे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते





