घाटकुराेडा रेती घाटावरुन पोखलंडसह 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

0
8

गोंदिया,दि.१०ः-तिरोडा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या मुंडीकोटा पोलीस चौकी हद्दीतील वैनगंगा नदीघाटावरील घाटकुरोडा येथे साठवून ठेवलेला रेतीच्या साठ्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळताच रविवारच्या रात्रीला धाड टाकून कारवाई केली.या कारवाईमध्ये 2 पोखलंड मशीन,3 टिप्पर व 105 ब्रास रेतीसह 1 कोटी 7 लाख 39 हजारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर रेतीसाठी हा गोंदिया निवासी महेंद्र खंडेलवाल यांच्या नावे असल्याची चर्चा आहे.घाटकुरोडा घाटावर कारवाई झाल्याच्या वृत्ताला पोलीस निरिक्षकांनी दुजोरा दिला आहे.विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वीच मानकेसा येथील रेतीसाठ्याकरीता असलेली राॅयल्टी मुंडेसरा घाटावरुन रेती वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे प्रकरण समोर आले होते.त्यामध्येही खंडेलवाल यांचेच लिलावात खरेदी केलेला घाट असल्याचेही समोर आले होते.सविस्तर वृत्त काही वेळात