24.4 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त

नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त

0
33

गडचिरोली,दि.19ः- पोलिस जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी गावातील बाजारत विस्फोटक लावून ठेवले होते. परंतु पोलिस जवानांच्या सतर्कतेन मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी विस्फोटक जप्त करून नक्षल्यांचा पोलिसांना जीव मारण्याचा प्रयत्न निकामी ठरल्याची घटना मंगळवार दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातारण निर्माण झाले होते. मंगळवारी नक्षल्यांनी गट्टा (जांभिया) गावातील बाजार परिसरात पोलिसांना जीव मारण्याच्या उद्देशाने विस्फोटक लावून ठेवले होते. मात्र याबाबतची गोपनिय माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सतर्कता बाळगून विस्फोटके जप्त केले.
यावर्षी सुरुवातीपासून पोलिस जवान नक्षल्यांना भारीत पडत असल्याने दिसून येत आहे. एप्रिल, मे महिन्यात भामरागड तालुक्यातील कसनसूर जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जवळपास ४0 नक्षल्यांना कंठस्नान घातले. ही कारवाई जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई होती. त्यामुळे हे संपूर्ण वर्ष पोलिस जवान नक्षल्यांना भारी पडत आहेत.

blank