25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ मामा चौकात सांडपाणी रस्त्यावर

मामा चौकात सांडपाणी रस्त्यावर

0
35

गोंदिया,दि.24ः- गोंदिया नगरपरिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या व नगराध्यक्षांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मामा चौक परिसरात सांडपाणी वाहून नेणार्या नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचला गेला आहे.पदाधिकारी व अधिकारी यांना कळवूनही कानाडोळा गेले जात असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे सदर सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले गेले.परिसरातील पदाधिकारी लक्ष देत नसल्याने नगरपरिषद उपाध्यक्षांना मनसेचे पदाधिकारी यांनी बोलावले असता त्यांच्यापाठोपाठ नगराध्यक्ष व परिसरातील नगरसेवकही धावत येऊन समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले.राजू कनोजिया,मनोज बिसेन,राजू बिसेन,विकास दमाये,उदाराम निखारे,बळीराम फुलबांधे,संतोष क्षिरसागर,क्षितीज वैद्य,रजत बागळे ,राजेश नागोसे आदींनी या समस्याकडे आंदोलनाचा इशारा दिल्यानतंर बांधकाम विभागाच्या अभियंत्याने येऊन नालीतयार करण्यासबंधीचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. काम सुरू होईल.असे आश्र्वासन शर्मा जी यांनी दिले.