25.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता सनफ्लॅगच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

सनफ्लॅगच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

0
26

भंडारा,दि.24ः जिल्हा मुख्यालयापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरठी येथील नामांकीत असलेल्या सनफ्लॅग शाळेच्या मुख्याध्यापकावर दीड महिन्यांनंतर मी टू अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.सनफ्लॅग शाळेचे मुख्याध्यापकांने शाळेतील गंथपाल असलेल्या महिला कर्मचार्याशी अश्लील शब्दांचा वापर करुन  महिलांचा अपमान होईल अशा शब्दांचा वापर करुन त्रास दिल्याबद्दल 12 नोव्हेंबरला वरठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.त्या तक्रारीवर मात्र लगेच कारवाई न करता पोलीस विभागाने आधी चौकशी करीत चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर मुख्याध्यापक दिपेश अग्रवाल विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.सदर महिला सुरक्षा कक्ष भंडारा येथील पोलीस उपनिरिक्षक लांजेवार यांच्या चौकशी अहवालावरुन तसेच विधी अधिकारी आर.एम. वाडीभस्मे यांनी दिलेल्या लेखी अभिप्रायानंतर वरठी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक मारबते हे करीत आहेत.