प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणार

0
11

भंडारा : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्याबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांचे नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन चर्चा केली. अधिकाऱ्यांनी मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार, अधीक्षक उराडे, संबंधित लिपीक व वित्त अधिकारी दिपक केदार उपस्थित होते. फेब्रुवारीचे मासिक वेतन करण्याबाबत प्राथमिक शिक्षकांचे पंचायत समिती स्तरावर वैद्यकीय रजा, अर्जित रजा, थकीत वेतनवाढ, वैद्यकीय परिपूर्ती देयक सहावे वेतन आयोग थांबलेले हप्ते, यासाठी अतिरिक्त निधी मिळण्याबाबत, प्राथमिक शिक्षकांचा स्थानांतरण सत्ता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदविधर प्राथमिक शिक्षकांचे कायम रिक्त पदे शासन निर्णयानुसार भरणे, सन १९९५ नंतर कार्यरत सर्व प्राथमिक शिक्षकांना कायम करण्याचे आदेश देणे, निवड श्रेणी, चट्टोपाध्याय वेतन तफावत प्रकरणे यांना मंजुरी देणे, शासकीय गटविमा रकमेची पावती, डी.सी.पी.एस. अंतर्गत कपात करण्यात आलेल्या रकमेचा हिशेब व पावती मिळण्याबाबत, २४ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांना निवड श्रेणी प्रशिक्षण देण्याबाबत, सर्व पदविधर प्राथमिक शिक्षकांना पदविधर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत, शिक्षक प्रशिक्षण सत्ता न मिळाल्याबाबत, सन २०१३-१४ या सत्रामध्ये निवड करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक यांचा सत्कार कार्यक्रम घेण्याबाबत, आंतरजिल्हा बदली आदेश पात्र शिक्षकांना मोकळे करण्याबाबत, अधीक्षक वर्ग २ यांचे कारभाराबाबत, माध्यमिक विभागातील बी.एड. पदवी प्राप्त शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत तसेच तीव्र उष्णतामान आणि ग्रामीण भागातील तीव्र पाणी टंचाईमुळे सर्व शाळा सकाळपाळीमध्ये सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली असून गुणवत्ता तपासणी संपताच आठवडाभरात शाळा सकाळ पाळीमध्ये भरविण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळामध्ये शीलकुमार वैद्य, रमेश काटेखाये, दुर्गाप्रसाद भड, नरेश कोल्हे, रामेश्वर कांबळे, नेपालसिंग तुरकर, शंकर नखाते, योगेश कुटे, तुलशीदास पटले, केशव बुरडे, अशोक ठाकरे, मुलचंद वाघाये, नरेश देशमुख, दिलीप ब्राह्मणकर, दिवाकर पांगूळ, दिगांबर जिभकाटे, युवराज वनवे, यशपाल बगमारे, नरेंद्र गायधने, भास्कर अलोणे, मोरेश्वर राऊत, एच.के. लंजे, अशोक चरडे, मुकेश मेश्राम, अरुण बघेले, ज्ञानेश्वर दमाहे, रवींद्र हटवार, योगेश पुडके, वनवास धनिस्कार, अशोक हजारे, राजू रोकडे, अशोक हजारे, विठ्ठल हारगुडे, देवराव थाटे, युवराज हुकरे, चेतानंद मेश्राम, विजय चाचेरे, धनराज ठवकर, कैलाश चव्हाण, विलास पुनवटकर, रमेश फटे, डी.बी. झिंगरे, मनोज साठवणे, रवि नखाते, रोशन कोडापे, विलास दिघोरे, सिद्धार्थ मुंडे यांचा समावेश आहे