वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

0
10

चंद्रपूर,दि.10ःः- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने वाघ व बिबटाच्या हल्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.त्यातच बकऱ्यांसाठी चारा आणयाला गेलेल्या चंद्रपूरलगतच्या जंगल परिसरात राजू गुजलेवार या युवकाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याची घटना 9 जानेवारीला सायकांळच्या सुमारास उघडकीस आली.जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करुन राजूच्या मानेचे लचके तोडल्याने त्याचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकार्यानी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.