25.5 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home विदर्भ काळ्या फिती लावून विरोध करणार तलाठी

काळ्या फिती लावून विरोध करणार तलाठी

0
19

गोंदिया : विदर्भ पटवारी संघाची बैठक पटवारी भवन गोविंदपूर गोंदिया येथे पार पडली. यात गुरूवार (दि.१९) सर्व जिल्ह्यातील तलाठी काळ्या फिती लावून शासनाद्वारे होणार्‍या अन्यायाचा विरोध करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
तसेच २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयांवर तलाठय़ांचा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास ३0 व ३१ मार्च बेमुदत रजा आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. याप्रसंगी विदर्भ संघाचे उपाध्यक्ष आर.पी. वैद्य, एस.जी. पवार, मलेवार, बी.डी. मेजरकर, एन.एस. लिल्हारे, राजू बोडखे, बी.एस. ठाकरे, आर.आय.तुरकर, बी.सी. कोटरकर, लांजेवार, सोनवाने, बिसेन, बनोटे, राठोड, बघेले, पारधी, पटले, ठकरेले, ठाकरे आदी उपस्थित होते.