सालेकसा व्यापारी संघाकडून तहसीलदार व ठाणेदारास निवेदन

0
20
सालेकसा,दि.07ः- बॅंक व्यवस्थपनाच्या अनागोंदी कारभारने त्रस्त सालेकसा तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने तहसीलदार सी.आर.भंडारी, व पोलिस स्टेशनचे ठानेदार डुनगे यांना निवेदन देऊन बँंकेत शुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची माहिती देत न्यायाची मागणी केली आहे.गेल्या एक आठवडयापासून बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, डी. सेंट्रल को.आप बँकेची लीक फेल असल्याने व्यापार ठप्प पडला आहे.व्यापारी वर्गाला त्याचा फटका बसला असून नुकसान सहन करावे लागत आहे.तसेच बँकेतील अधिकारी कर्मचारी व्यापारी वर्गाशी अभद्र व अपमानजनक व्यवहार करीत असल्याने लक्ष् घालून न्याय मिळवून द्यावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी व्यापारी संघटनेचे
दौलत अग्रवाल, मनप्रीत सिंग भाटिया , सुभाष हमने ,रमेश फुडे, सुजीत बंसोड, सुनील असाटी, लिखेद्र साह, देवेंद्र कटरे, दर्पण जैन, सुमित अग्रवाल, पंकज गुप्ता, लखन अग्रवाल, अजय क्षीरसागर, व अन्य व्यपारी उपस्थित होते.