खा.प्रफुल पटेलांचा दौरा

0
8

गोंदिया : खासदार प्रफुल पटेल २१ ते २३ मार्च दरम्यान भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. २१ मार्चला भंडारा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमानंतर २२ मार्चला दुपारी १२ वाजता आमगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारोहात उपस्थित राहणार आहेत. २३ मार्चला दुपारी १२ वाजता सडक अर्जुनी येथील दुर्गा चौकात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्पेâ आयोजित जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. सर्व कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.