झाडुटोला येथील साठवण बंधारा निकृष्ठ

0
17

गोंदिया : लघु सिंचन (जलसंधारण) विभाग गोंदियातर्पेâ तालुक्यातील झाडुटोला येथे जागा उपलब्ध नसताना सुद्धा परस्पर प्रस्तावित करुन साठवण बंधारा तयार करण्यात आला. बंधाNयाचे बांधकाम निकृष्ठ असून बांधलेल्या बंधायाचा वापरच होणार नसल्याचा आरोप सरपंच प्रकाश कावळे यांनी केला आहे.
लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या वतीने झाडुटोला येथील स्मशानशेडच्या अगदी जवळच साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, पाणी साठवणुकीच्या दृष्टीने बंधारा विरुद्ध दिशेला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. योग्य दस्तऐवज न घेता फक्त टोपो शीटवर दाखवून पसस्पर कामे काढण्याच्या दृष्टीने कामे पास करण्यात आली.
बंधाNयाचे बांधकामही निकृष्ठ आहे. यात कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. नाल्याला पाणी असतात, काँक्रीटच्या जागी मोठे दगड टाकण्यात आले. दरम्यान नागरिकांनी विचारले असता अंदाजपत्रकात नमूद असल्याचे अधिकारी म्हणतात. करारनामाची मूदत १४ आक्टोंबर २०१४ होती. मात्र, अधिकाNयांनी मातीचे काम आणि पिचींग जानेवारी २०१५ मध्ये केल्याचे निष्पन्न झाले आहे. करारनाम्याची मुदतवाढ न घेता आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी नवीन पार आणि पिचींग करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लोकार्पणासाठी अधिकारी आले असता, बांधकाम अवैध व अपूर्ण असल्याने सरपंचांनी लोकार्पणाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट केले आहे. सदर प्रकरणाचा सखोल चौकशी व्हावी आणि दोषी भ्रष्ट अधिकाNयांकडून ज्या शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करण्यात यावे, अशी मागणी जलसंधारणमंत्री पंकजामुडे यांना करण्यात आली असून तक्रारीची प्रतिक्रिया व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद आाि जिल्हाधिकाNयांनाही देण्यात आला आहे.