नवेझरी ग्राममंडळाच्या दानदात्यांच्या वारसांना मतदार यादीतून वगळले

0
43
विभागीय आयुक्तांकडे तहसिलादारांची तक्रार
गोंदिया,दि.१५-आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात ३ गावामध्ये ग्राममंडळाची स्थापना करण्यात आली.त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील नवेझरी व कुलपा या गावांचा तर सालेकसा तालुक्यातील कुल्लरभट्टी या गावाचा समावेश आहे.या ३ गावापैकी तिरोडा तालुक्यातील नवेझरी ग्राममंडळाच्या कार्यकारीणीचे ४ वर्ष पुर्ण झाल्याने निवडणुक लागली.यासाठी मतदारयादी तयार करुन निवडणुक प्रकिया सुरु करण्यात आली.मात्र ही प्रकिया करतांना निवडणुक अधिकारी असलेले तिरोडा तहसिलदार यांनी महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ मधील प्रकरण २ मधील कलम ६अन्वये बाहेर गावी राहत असलेल्या सदस्यांना सुध्दा ग्राममंडळाच्या सभेत हजर राहण्याचे अधिकार तसेच कलम १०(१) अन्वये त्यांना मतदानाचा अधिकार सुध्दा प्रदान केला आहे.परंतु या ठिकाणी मतदारयादीतून दानदात्यांच्या वारसांना वगळून नव्या मतदारांचा समावेश केल्याने या प्रकियेवर आक्षेप नोंदविण्यात आल्याने ही निवडणुक प्रकियाच सध्या स्थगित झाली आहे.तर काहींनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करुन न्याय मागितला आहे.
नवेझरी येथील जमीन दान देणाèया पूर्वजांच्या ५७ वारसदारांना ग्रामदान मंडळाच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार ग्राम नवेझरी येथे उघडकीस आला आहे. तिरोडा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने काही जणांनी केलेल्या अर्जावरुन यादीतून नावे वगळल्याचे म्हटले आहे. यामुळे वारसांनामध्ये तीव्र असंतोष असून चौकशी करुन नावे समाविष्ठ करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४  अन्वये नवेझरी येथे ग्राम मंडळाची स्थापना करण्यात आली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून गावाला प्रेरणा मिळाली. विठोबा भांडारकर, रामाजी भांडारकर, मोरेश्वर हरडे, मोरबा हरडे, गंगाराम हरडे यांनी जमीन दान दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी भूमिहीनांना जमिनी दिल्या. मुल्याच्या २० वा अंशदान पैश्याच्या स्वरुपात दान ग्राम मंडळाला दिले. ग्रामदान मंडळाच्या सदस्य नोंदणी पुस्तकात असलेली नावे ही ग्राममंडळाच्या स्थापनेच्या वेळी जमीन दान दिलेल्या किंवा अंशदान दिलेल्या व्यक्तीची व त्यांच्या वारसाची आहेत. ग्रामदान अधिनियमान्वये बाहेगावी कार्यानिर्मिती वारसदार असणाèया व्यक्तींना सुध्दा ग्राम मंडळाच्या सभेत येण्याचा व निवडणुकीत मतदानाचा अधिकार सुध्दा दिला आहे. परंतु काही व्यक्तीची नावे वगळण्याकरीता खोटी तक्रार तहसीलदारांना केली गेली.त्या अर्जावर तहसीलदारानी १५ जानेवारीला आपेक्ष व दावे सादर करण्याकरीता वारसदारांना पत्र पाठविले. हे पत्र तलाठ्याकडून वारसदारांना १६ जानेवारीला मिळाले.पत्रानुसार १७ जानेवारी ही हरकती व दावे सादर करण्याची अंतीम मुदत होती. परंतु अल्प कालावधीत बाहेर असलेल्या व्यक्तींना येणे शक्य झाले नाही. त्यामुळे ग्राममंडळ सदस्यांचा नोंदणी पुस्तकात ५७ सदस्यांची नावे वगळण्यात आली.परिणामी त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.तर ग्रामदान अधिनियमानुसार तहसिलदारांना नावे वगळण्याचा अधिकार नसल्याचे नवेझरी येथील ग्रामदान मंडळाचे सदस्य महेंद्र भांडारकर यांचे म्हणने आहे.
तर ज्यांची नावे वगळण्यात आली,त्या सदस्यांनी या प्रकरणाची जिल्हाधिकाèयांकडे तक्रार करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन वगळलेली नावे यादीत नावे समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी क्रिष्णा भांडारकर, लता भांडारकर, शिवशंकर मेश्राम, रतन मेश्राम, ओमराज मेश्राम यांच्यासह ५४ सदस्य वारसदारांनी केली आहे.तसेच याप्रकरणी वारसदारांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केल्याची माहिती आहे.
ग्रामदान अधिनियमातंर्गत बाहेरगावी कामानिमित्त असणाèया दानदात्यांच्या वारसांना ग्राम मंडळाच्या सभेत येण्याचा व ग्राम मंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. परंतु यादीतून नावे वगळण्यात आल्याने त्यांना निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
विशेष शासनाने ग्राममंडŸळाच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक असेल,त्या नोंदणीपुस्तकात स्पष्टपणे ज्यांनी ग्रामदानाच्या रुपाने आपल्या जमिनी दान केल्या असतील परंतु जे उक्त गावात राहत नसतील अशा इसमांची नावेसुध्दा समाविष्ठ करण्यात येतील अशा उल्लेख केला आहे.तसेच जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाèयाने ग्रामदान गावाच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक अद्यावत ठेवले पाहिजे असेही म्हटले आहे.