‘मनरेगा’ची ४४ हजार कामे सुरू,सर्वाधिक मजुर गोंदिया जिल्ह्यात

0
21

मुंबई,दि.15 – दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात रोजगार हमी योजना विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) राज्यात ४४ हजार ५५५ कामे सुरू असून, त्यावर २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती आहे. जानेवारीअखेर मजुरांची संख्या ४४ हजार ६१९ इतकी वाढली आहे. याशिवाय मजुरांना वेळेत मजुरी देण्याचे प्रमाणही वाढले असून, जानेवारीअखेर हे प्रमाण ९४ टक्के इतके आहे, अशी माहिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.सोबतच सर्वाधिक मजुरांची संख्या गोंदिया जिल्ह्यात असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

रावल म्हणाले, की दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर मागेल त्याला तातडीने काम उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. केंद्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी मजुरीचे ५० दिवस वाढवून दिले आहेत.राज्यातील जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मनरेगा कामावरील मजुरांचा तपशीलाकडे लक्ष दिल्यास  गोंदिया – ६ हजार ७७७,गडचिरोली – ५ हजार ८२३,उस्मानाबाद – ४ हजार २२६,पालघर – २ हजार ९३७,परभणी – २ हजार ९३५,लातूर – २ हजार ७७१,चंद्रपूर -२ हजार ६०५,भंडारा – २ हजार ५२४,जळगाव – २ हजार ६६ व   बीड – १ हजार ४९८ असा आहे.